शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम परवान्यासाठी क्षेत्रफळाची अट शिथिल : प्रकाश मेहता यांचे निर्देश-प्रधानमंत्री आवास योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:29 IST

इचलकरंजी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आवश्यक असलेल्या बांधकाम परवाना नियमावलीमध्ये शिथिलता आणून कमी क्षेत्रफळ असलेल्या भूखंडधारकांना बांधकाम परवाना देण्याचे निर्देश

ठळक मुद्दे सुरेश हाळवणकर यांची माहिती

इचलकरंजी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आवश्यक असलेल्या बांधकाम परवाना नियमावलीमध्ये शिथिलता आणून कमी क्षेत्रफळ असलेल्या भूखंडधारकांना बांधकाम परवाना देण्याचे निर्देश गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी मंगळवारी दिले, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे.

येथील नगरपालिकेकडे सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीमधील अडचणींबाबत उपाययोजना करण्यासाठी गृहनिर्माणमंत्री मेहता यांच्याकडे आमदार हाळवणकर यांनी बैठकीचे आयोजन केले होते. गृहनिर्माणमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये इचलकरंजी व वडगाव या दोन्ही नगरपालिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेकरिता संयुक्त तांत्रिक कक्षास मान्यता देण्यात आली. तसेच या कक्षाकडे कंत्राटी पद्धतीने तांत्रिक पदे व मानधनासाठी अनुदान मंजूर करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला. त्यामुळे आता गेले दहा महिने थकीत राहिलेले कर्मचाऱ्यांचे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

इचलकरंजीमध्ये व्यक्तिगत लाभार्थी म्हणून घरकुल बांधण्यास अनुदान देण्याच्या योजनेमध्ये १३३ लाभार्थ्यांच्या प्रकल्प अहवालास मंगळवारी मंजुरी देण्यात आली. त्यांचे अनुदानसुद्धा त्वरित वितरित करण्याचे आदेश मंत्री मेहता यांनी दिले. तसेच इचलकरंजी शहरातील नगररचना योजना क्रमांक १ व २ चे फेरफार काम सुरू असल्याने नगरपालिकेला बांधकाम परवाना देण्यासाठी काही अडचणी आहेत. त्याचप्रमाणे प्रचलित बांधकाम परवाना नियमावलीनुसार भूखंडाचे क्षेत्रफळ कमी असल्यास बांधकाम परवाना देता येत नाही. या दोन्ही अडचणींबाबत ‘म्हाडा’ने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमावलीनुसार लेखी मार्गदर्शन संबंधितांना पाठवावे, असे आदेश मंत्री मेहता यांनी दिले, असेही हाळवणकर यांनी स्पष्ट केले.बँकांना बंधनकारकगृहनिर्माणमंत्री मेहता यांच्याकडील बैठकीमध्ये आमदार हाळवणकर यांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी राष्टÑीयीकृत व खासगी बॅँका उदासीनता दाखवितात, ही बाब आमदार हाळवणकर यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर मंत्री मेहता यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील नियमानुसार बॅँकांना कर्ज वितरण करणे बंधनकारक आहे. तरी अशी कर्ज प्रकरणे मंजूर करण्याबाबत हुडको व राष्टÑीय गृहनिर्माण महामंडळ यांच्यामार्फत बॅँकांना निर्देश देण्याचे आदेश दिले.३०० चौरस फुटांसाठी बांधकाम परवानापंतप्रधान आवास योजनेसाठी कमी क्षेत्रफळ असलेल्या म्हणजे सुमारे ३०० चौरस फूट क्षेत्रफळासाठी बांधकाम परवाना देण्यात येईल. मात्र, या योजनेमध्ये लाभार्थी होण्यासाठी बांधकाम परवान्याची अट अनिवार्य असेल, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले, तर याबाबतचे स्पष्टीकरण करणारे मार्गदर्शन राज्यातील सर्व नगरपालिकांना ‘हुडको’मार्फत पाठविण्यात यावेत, असेही या बैठकीत निश्चित केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgovernment schemeसरकारी योजना